Friday, December 5, 2008

विपर्यास आणि अध्यात्म



27 फेब्रुवारी

विपर्यास आणि अध्यात्म

विपर्यास आणि अध्यात्म यांचा जवळचा संबंध आहे. याचा विचार करताना आपणांला प्रथमत: ज्ञान म्हणजे काय? याचा विचार करुयात.
:- ज्ञान म्हणजे ज्या माहितीचे आपण तात्कालिक उपलब्ध पुरावे, दुवे, सिंध्दांत, आपली कक्षा यां सर्वांच्या साहाय्याने जे आपण सर्वोचित म्हणुन मानतो त्याला ज्ञान म्हणता येईल. अश्याप्रकारच्या ज्ञानाचा सर्व काळात उपयोग नसतो. कारण, या ज्ञानाच्या व्याख्येला काही मर्यादा आहेत. कारण या व्याख्ये नूसार आपणां समोर काही गृहितके येतात.
१) ज्ञान हे नेहमी तात्कालिक माहिती, अनूभवांवर आधारित असते. :- यामूळे या तात्कालिकतेचा आपणांला तोटाच होतो. माहिती ही सतत अद्यययावत होत असते. त्यामुळे आपण जर सर्व माहिती पुरातन पुरातन वापरण्याचा प्रयत्न करु लागलो तर खरे ज्ञान आपल्याला कधिच सापडणार नाही. आज धर्म/अध्यात्मात तर सध्या प्रत्येक जण/धर्म आपला धर्म किती पुरातन आहे ? हे सांगण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामूळे त्या मार्गाने ज्ञान किती सापडेल याबाबत शंका आहेत. यातूनच आपल्याला हे लक्षात येईल की, एका काळात मिळवलेले ज्ञान कालांतराने निष्फ़ळ ठरते. वा परिस्थिती नूसार त्यात बदल होतो.
२) आपली कक्षा/मर्यादा :- ज्ञानार्जनामध्ये आपण सगळे जण उपलब्ध माहितीवर आपल्या कक्षेनूसार प्रक्रिया करुन काही निकष काढण्याचा प्रयत्न करतो. :- याचा तोटा हा होतो की, आपण एका विशिष्ट मर्यादे पर्यंतच विचार करु शकतो त्यामुळे त्याबाहेर असणार्या बाबीं आपण समजून घेऊ शकत नाही. याचा अर्थ ज्ञानात सर्वोपरी किंवा सर्वज्ञता अशी स्थिती अशक्य आहे.
३) ज्ञान हे नेहमी उपलब्ध माहितीवर आधारित असते :- ज्ञानाचे अर्जन हे नेहमी उपलब्ध माहिती गृहितके यांवर साध्य होते. हे आपण पाहिले. :- याचा हा तोटा होतो की, ज्ञानाच्या सभोवतालच्या माहिती संच आपणांला मर्यादित मिळतो त्याची उपलब्धता ही नेहमी संपुर्ण असेलच असे नाही. त्यामूळे मिळणार्या ज्ञानावर परिणाम होतो व आपण अल्पज्ञ बनतो.
याच कारणामुळे विपर्यस्त ज्ञान व अध्यात्म यांचा जवळचा संबंध आहे असे मी म्हणले आहे. विपर्यासाचे कारण मर्यादित दुवे त्यांवर होणारा कालांतराचा प्रभाव यांसर्वांमुळेच आपल्याला आजचे विपर्यस्त ज्ञानाला समोरे जावे लागत आहे.
तरी आपण त्यांच दुवे व ज्ञानाच्या आधारावर आजच्या धर्म व धर्म विषयक संकल्पनांची निर्मिती केली आहे परंतू त्याचा आता उपयोग राहिलेला नाही त्यासाठी आपणांला नविन धर्माच्या निर्मितीमध्ये वा निधर्मत्व स्विकारताना या
सर्व बाबींचा विचार क्रमप्राप्त ठरणार आहे. जेणॆकरुन या मानव जिवनावश्यक बाबीं म्हणजे धर्म आणि इतर तत्संबंधीतांचा पुर्नविचार करावा लागणार आहे.
धर्माची आवश्यकता काय़?
का आला हा धर्म ?
कधी आपण हा विचार केला आहे का?
प्रथमत : एक विचार !
मग एक साधना पध्दती !!
नंतर एक संप्रदाय म्हणून !!!
आणि मग त्याचे आजच्या विज्ञान युगाला बाधक ठरणाऱ्या धर्म या बाबींत रुपांतर झाले.
हा आहे का प्रवास धर्माचा ? केला आहे का विचार आपण कधी?
तर असेच आहे हे असे आपल्याला लक्षात येईल आपण जेव्हा मानव्याच्या प्रगतीचा आलेख व्यवस्थितपणे अभ्यासल्यास नक्किच हेच लक्षात येते.
याठिकाणी वरील उताऱ्यात मी 'मानवाच्या' म्हणले नाही. 'मानव्याच्या' म्हणले आहे. कारण मानव ही संज्ञा आपण काही कपिरुप असणाऱ्या आदिम जमातिंना वापरु शकत नाही. त्या कपीत्वातून आपण विकसित होऊन आजच्या मानव्यास प्राप्त जाहलो आहोत. त्याचे कारण आपल्या मध्ये असणारी अत्युच्च अशी संशोधक वृत्तीच कारणीभूत आहेत. आपल्या मूल जीवाच्या विकासाच्या आधी पासुनही आपल्या पृथ्वीवर प्राणीज विकास होताच परंतू आपणाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आपली बुध्दी व तीचे परिस्थितीनूसार बदलत्या स्वरुपात बदलाणारी विचारांची दिशा. हेच आपल्याला त्यासर्वांपसुन भिन्न ठेवते. असो,
तरीही, मानव्याचा विकास व्हावा असे मला वाटते.
मानवाचा विकास झाला आहे, चालू आहे, चालू राहाणार आहे, परंतु त्याचबरोबर मानव्याचा ही विकास व्हावा असे मला वाटते, मानव्य ही काय संकल्पना आहे त्याचा उल्लेख मी पुढील एखाद्या लेखात करिनच परंतू. माझ्या मते ही संकल्पना काही एखाद्या ग्रंथ रुपाने कधिही समोर यावी असे मला वाटत नाही. किंबहुना ती जर ग्रंथ रुपाने आपल्या समोर आली तर त्यासंकल्पनांचाही आपण पुजा करण्यास सुरुवात करु लागू. आरतीची व्यवस्था करु. मंदिर बांधू. व त्यासर्वांच्या देखरेखीसाठी देणग्यांची अपेक्षा करु लागू.
या सर्व दुष्ट चक्रातूंन प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माने भ्रमण केले आहे. म्हणूनच प्रयत्न असा असावा की, या सर्वां पासुन निराळे अश्याप्रकारच्या जिवनाची निर्मिती व्हावी अशी आशा मी ठेवतो.
जर धर्माच्या जोखडातून मोकळे झाल्यास आपण धर्माच्या संकूचित विचार प्रवाहाच्या जाळ्यातून बाहेर पडु शकू का ? नक्कीच नाही. हेच याचे उत्तर आहे. का ? तर धर्माच्या गोंधळातून बाहेर पडावयाचे असल्यास निधर्मी होऊन भागते काय? वा दुसरा काही पर्याय आहे का?
या ही प्रश्नांचे उत्तरे
असेच आहे असे नाही.
आपण आता सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करुयात.

निधर्मि होऊन भागेल काय ?
अशी अवस्था ज्यात आपण कोणत्याच धर्माचा विचार करणार नाही . असे काही शक्य आहे काय?
तर असे काही शक्य नाही. औपचारिकरित्या जरी आपण कोणत्याच धर्माचा स्विकार केला नसेल तरीही आपणांला या जोखडाचा स्विकार करावाच लागेल. हे सम्जण्यासाठी आपल्याला धर्म म्हणजे नक्की काय हे जाणावे लागेल आजपर्यंत आपण ज्याचा विचार क्षणा-क्षणाला करतो. त्याच्यासाठी आपल्या पुर्वजांनी प्राणार्पण केले असे आपण गर्वाने सांगतो. तो धर्म काय आहे. कश्यासाठी आहे ? याचा विचार आपण कधी करतो. त्यात कोणत्या प्रकारची सुधारणा होऊ शकते. आपण काही चूकतो अहोत का ? नक्कीच आपण या सर्वांचा विचार स्वप्नातही करित नाही. धर्म म्हणजे कर्मकांड, पुजा-अर्चा, इ. होय. आपण एवढाच मर्यादित अर्थ धर्माचा लावून मोकळे होतो.
धर्म म्हणजे काय ?
धर्म या शब्दाची उत्पती संस्कृत 'धृ' या धातूपासून झाली.
'धृ' म्हणजे धारण करणे.
जिवन जगण्य़ासंदर्भातील व अध्यात्मातील अंतिम सत्याच्या साठी वाटचालिचा विशिष्ट मार्गाचे, मार्गदर्शक(?)तत्वाचे मृत्यू पर्यंत धारण म्हणजेच धर्म होय.
अशी धर्माची सर्वकष अशी व्याख्या करता येईल. ज्याद्वारे आपण खऱ्या अर्थाने धर्माच्या विचारांच्या जवळ पोहोचतो.
आहेत का सर्व सद्यकालिन प्रस्थापित धर्म या व्याख्येच्या जवळपास तरी. सापडत असतील तर मला खालिल पत्त्यावर कळवावे.
विनोदाचा भाग सोडून दिल्यास काय हातास लागते. काही नाही. म्हणजेच या धर्माचा आपण कधीच त्याग केला आहे. परमेश्वर प्राप्ति हे एक स्वप्न बनले आहे. आणी धर्माच्या निती-अनिती विषयक तत्वांचा बाजार बनून तर हजारो वर्षे झाली. धर्म स्थापकांच्या मृत्यूनेच त्यांनी स्थापिलेल्या धर्माचा अंत होतो. हेच आपल्याला लक्षात येते.
आपण जर सर्व धर्मांचा विचार केल्यास लक्षात येते. येशूने स्थापिलेल्या ख्रिश्चन हा शांतीचा प्रसारक धर्म शत्रूलाही स्वत: सुळावर असतानाही माफ़ कर असे परमेशवराला सांगणारा धर्म आज तागायत. संपुर्ण जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करित आहे. किती स्विकारली आपण आपल्या धर्माची निती-मुल्ये.
फ़क्त ख्रिश्चन धर्माचीच ही अवस्था आहे असे नाही. तर आपल्या हिंदू सकट सर्वांचीच ती अवस्था आहे. धर्माचा उपयोग आज फ़क्त मताचे राजकारण करण्यासाठीच होतो आहे.
परमेश्वर प्राप्तिचा मार्ग जर आपण विचारात घेण्याऎवजी सर्वथा निष्फ़ळ ठरणाऱ्या कर्मकांडास आपण
परमेश्वर प्राप्तिचा मार्ग जर आपण विचारात घेण्याऎवजी सर्वथा निष्फ़ळ ठरणाऱ्या कर्मकांडास आपण स्थान दिले. त्याचा उपयोग काय हाही विचार आपल्या मनाला शिवला नाही.
तथापी आपल्याला मनूष्याच्या सर्वांगिण जिवनाच्या समृध्दी साठी जे काही शक्य असेल ते सर्वाथाने स्विकारणे हेच धर्माचे आद्य कर्तव्य मानून नूतन धर्म ही संकल्पना स्विकारावी लागणार आहे.
जिवनावश्यकमुल्यप्रधान दृष्टिने केलेला धर्मविचार.
अश्याप्रकारचा विचार काहीच लोकांनी केलेला आहे. त्यातील काहींचा आपण येथे विचार करणार आहोत. भारतात असे प्रयत्न निम्नोक्त विचारवंतांनी केले आहेत.
२) श्री भगवान रजनिशचंद्रमोहन जैन तथा ओशो यांनी ही पुढे १९६० ते १९९० या काळात धर्माचा जिवनमूल्याधिष्ठीत असा विचार करण्याचा प्रयत्न केला परंतू. त्यांचा विचार हा अविचारसही सरस ठरणारा ठरला.
तथापी त्यांच्या मोजक्या विचारांचा उहापोह येथे आपण करूयात.
त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांतून धर्माविषयी लिहीले. त्यांचे विचार आयूष्याच्या शेवट पर्यंत अनेक मार्गाने भ्रमण करून ते सर्वांत शेवट. ध्यान ह्याच समेवर येत व त्यांनी केलेल्या कार्याचा परिपाक म्हणून अनेकविध ध्यान पध्दतीच आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्यांचा आपल्या जिवनावश्यकमुल्याधिष्ठीत दृष्टीकोना बाबत चे विचार असे आहेत की, ध्यानात प्रगती झाली की, जे विचार मीळतील तेच जिवनावश्यक आहेत.
त्यांना त्यांच्या संकल्पनेतील ''झोर्बा दि बुध्दा'' हे मनूष्याचे रुप हवे होते. त्याने झोर्बाच्या आयुष्यातील भौतिक व बुध्दच्या आयुष्यातील अभौतिक अध्यात्मिक उन्नतीशी मतलब होते.
परंतू त्यांनी निर्माण केलेल्या ध्यान पध्दतीच इतक्या वादग्रस्त ठरल्या कि, त्यातून ज्ञान(?) प्राप्त होणार याचीही शंका येते.
माझ्या मतानूसार तरी रजनिशांचे हे सर्व आयुष्याचे कारस्थान धर्म व अध्यात्म या दोन्हींचे विडंबंन करण्या करिताच केले असावे. कारण त्यांनी आयुष्यभर फ़क्त इतरांचे विचार मांडणे व ते पुन्हा खोडणे ह्या शिवाय काहीच केले नाही. म्हणजे सुरुवातीला १९६० ला ब्रह्मचर्याची महती गाणारा मनूष्य १९६४ला ''संभोगातून समाधिकडे'' असा नविन व अध्यात्मिक(?) विचार मांडतो. त्यातून काय साध्य होते. हे त्यांनाच ठावूक मात्र त्यांनी त्यातून काही साध्य केले का नाही हे ते स्वत:च पाहाणार नाहीत असेही त्यांनी एक ठिकाणी म्हणून ठेवले आहे.
बाकीच्या कोणत्याही महाराजांपेक्षा हे माहाराज जरा विज्ञान वाद, व्यवहार वाद ह्यांचा विचार

बाकीच्या कोणत्याही महाराजांपेक्षा हे माहाराज जरा विज्ञान वाद, व्यवहार वाद ह्यांचा विचार करणारे होते. असे मला वाटते.
एकूणच यांचा ही विचार आपल्याला सर्वार्थाने त्याज्य आहे. कदाचित रजनिश त्यांच्या काळापेक्षा जर ५० वर्षे उशिरा जन्मले असते. तर त्यांना जगाने स्विकारले असते. व त्यांचे काही विचार सर्वांनिच आचरणात आणले असते. ''संभोगातून समाधिकडे हा विचार मात्र सर्वथा त्याज्यच राहातो हेही मी याठीकाणी नमूद करतो. { रजनिश संकेतस्थळ oshoworld.com }
३) श्री स्वामी दयानंद सरस्वती :
यांनी ही आपल्या प्रस्थापित हिंदू धर्माचे धिंडवडे काढले व त्यातूनच मूळ वैदिक साहित्य संपदाच ग्राह्य धरुन धर्माचा विचार करणारी नवी संकल्पना निर्माण झाली. त्यात दैनिक साधनेत अग्निहोत्राचा सहभाग करण्य़ात आला. मुर्तिपुजा त्याज्य ठरविण्यात आली. या सर्वांतूही मूळ तसेच राहाते असे मला वाटते नूतन निर्मितीच्या फ़ंद्यात सर्वांनी जुनेच नव्या वेष्टनात गुंडाळून हातात ठेवत सर्वांनीच हिंदूंना गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे.
जिवनमुल्याधिष्ठित दृष्टीकोन तर स्वामींच्या कोणत्याच लिखाणात दिसत नाही. प्रस्थापितांना धक्का देऊन माजी प्रस्थापितांना परत आपल्या जागेवर बसविण्याचा हा प्रयत्न होता.
{संदर्भ : सत्यार्थ प्रकाश }
या पुढील विचार दुसऱ्या लेखाच्या रुपाने आपल्या समोर येतीलच त्याचे काम चालू आहे. काय असावा नव धर्म ? असावा की नसावा ? याचा ही विचार ? आपण करण्याचा प्रयत्न करुयात .
धन्यवाद !!!
मराठीतील आपल्या संकेतस्थळाने मला हे मांडण्य़ाची संधी दिली त्याबाबत पुन्हा एकदा धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया साभार स्विकारल्या जातिल.
भ्रमण दुरध्वनी : ०९२२६७८०६५२.
विद्युत पत्र पत्ता :suresh_khole@yahoo.com